“बिजप्रक्रिया”; रोग प्रतिबंधासाठी कशी आहे वरदान…

0

लोकशाही विशेष लेख

भारत हा कृषिप्रधान देश असतांना भारतीय लोकसंख्या पाहता लोकांची अन्नाची गरज भागवणे हे आज सर्वात मोठे आव्हान आहे. हाच उद्दिष्ट ठेवत शेतकरी शेती उत्पादन कसा वाढेल याच संशोधनात असतात. विविध नवनवीन तंत्रज्ञानाद्वारे शेतीची उत्पादकता वाढविण्यावर कृषी विद्यापीठ तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या भर आहे. शेती उत्पादन वाढविण्यात महत्वाच्या घटक म्हणजे कीड अन् किटक नियंत्रण. कीड-कीटक नियंत्रणाच्या खर्चाच्या विचार केला असता कीड प्रतिबंधक (Insect Repellent) हा विषय साजेसा आणि कमी खर्चिक आहे.

कीड तसेच रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणजे “बीज प्रक्रिया” (Seed Processing). कृषी उत्पादनात पीक संरक्षणास जेवढे महत्त्व तेवढेच बीज प्रक्रियेस आहे. परंतु बियाणे प्रक्रियेस पाहिजे तेवढं महत्व दिले जात नाही. निरनिराळ्या कीटकनाशकांची फवारणी करून कीड कीटक नियंत्रण होऊ शकते परंतु त्यास लागणारा खर्च मात्र जास्त असतो त्याऐवजी बीजप्रक्रिया हे प्रतिबंधात्मक उपाय ठरू शकते.

बीजप्रक्रिया करण्याचे फायदे

१) पेरणीसाठी एकसारखे समान बियाणे तयार होते.
२) बियाणे व रोगांद्वारे होणाऱ्या रोगांचे नियंत्रण शक्य होते.
३) रोग तसेच कीड नियंत्रणाचा खर्चात बचत होते.
४) बियाण्याची उगवण शक्ती वाढून उत्पन्नात लक्षणीय वाढ होते.
५) बियाणांच्या दर्जा सुधारतो.

बीजप्रक्रिया प्रकार
बीजप्रक्रिया जैविक तसेच रासायनिक पद्धतीने केली जाऊ शकते. आज घडीला विविध रसायन बीजप्रक्रिया करीता बाजारात उपलब्ध आहे.

• जैविक बीजप्रक्रिया – जैविक प्रक्रियेसाठी पी एस बी, अझेटोबॅक्टर,रायझोबीयम यांच्या मुख्यतः वापर केला जातो. याद्वारे बीजप्रक्रिया करून बियाण्याची उगवण शक्ती वाढून रोग प्रतिकार क्षमता देखील वाढते. ही बीज प्रक्रिया करतांना त्यासोबत जिवाणूंच्या गुणोत्तरासाठी गुळाच्या माध्यम म्हणून वापर करतात.

• रासायनिक बीजप्रक्रिया – जैविक बीजप्रक्रियेच्या तुलनेत रासायनिक बीजप्रक्रिया सुलभ आहे. यात बुरशीनाशक तसेच कीटकनाशकाच्या द्रावणात बियाणे ठराविक काळासाठी भिजवतात. त्यानंतर बुरशीनाशकाचे घट्ट द्रावण करून बियाण्यास चोळतात. या प्रक्रियेसाठी “सिड ड्रेसिंग ड्रमचा” वापर देखील केला जातो.

बीजप्रक्रियासाठी काही रासायनिक बुरशीनाशके

१) गंधक – गंधक हे बुरशीनाशक पारंपरिकतेने शेतकरी वापरत आहेत. मुख्यतः ज्वारी पिकास याची प्रक्रिया केली जाते.
२) थायरम – थायरमची प्रक्रिया गहू,मका,सोयाबीन आदी पिकांत केली जाते. यामुळे बुरशीजन्य रोगांचे प्रादुर्भाव कमी होते.
३) कार्बेन्डेझीम – या बुरशीनाशकाची भुईमूग,सूर्यफूल आदी पिकांमध्ये प्रति किलो २ ते ३ ग्राम या प्रमाणात प्रक्रिया करतात.
४) कॅप्टन – सदर बुरशीनाशक देखील मोठ्या प्रमाणात शेतकरी प्रिय आहे. या बुरशीनाशकांचा वापर गहू,मका,सोयाबीन आदी धान्य तसेच तेलबिया पिकांच्या बियाणे प्रक्रियेत होतो.

परेश दिलीप पालीवाल
संचालक, श्री नाटेश्र्वर कृषी सेवा केंद्र, लासूर
मो. ८३७८०९६३०३

Leave A Reply

Your email address will not be published.