गोदावरी अभियांत्रिकीत उल्हास २०२३ (कल्चरल नाईट) उत्साहात

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

गोदावरी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ३ मे २०२३ ते ५ मे २०२३ यादरम्यान उल्हास २०२३ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या कल्चरल नाईटच्या उद्घाटनाप्रसंगी गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटीलहे उपस्थित होते.

याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून एम. राजकुमार (आय.पी.एस. सुप्रीटेंडंट ऑफ पोलीस जळगाव), तसेच दीपक चौधरी (चेअरमन, स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल इंडस्ट्रीज लिमिटेड) हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे त्यांच्यासोबत डॉ.वर्षा पाटील (सचिव, गोदावरी फाउंडेशन) डॉ.केतकी पाटील (सदस्य, गोदावरी फाउंडेशन), डॉ.वैभव पाटील (डी.एम. कार्डिओलॉजिस्ट), डॉ एन. एस. आर्वीकर, डॉ. प्रशांत वारके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील, प्रा. दीपक झांबरे (समन्वयक तंत्रनिकेतन), प्रा. हेमंत इंगळे (अधिष्ठाता), प्रा. भावना झांबरे (समन्वयक, उल्हास २घ२३) सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून अहिराणी सुपरस्टार सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर हे उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कल्चरल नाईटचे उद्घाटन करण्यात आले. प्रास्ताविक डॉ.विजयकुमार पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक चौधरी यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना सांगितले की, अभ्यास करत असताना आपले आरोग्य तेवढेच महत्त्वाचे आहे, जेणेकरून आपले पुढील आयुष्य हे सुदृढ असेल. त्यानंतर एम राजकुमार यांनी स्नेहसंमेलन संदर्भात सांगताना स्वतःच्या आठवणींना उजाळा दिला. विद्यार्थी दशेत असताना काही गुण जे सुप्त अवस्थेत असतात त्यांना समोर आणण्यासाठी हे उपयुक्त प्लॅटफॉर्म आहे असे त्यांनी नमूद केले. भविष्यात विद्यार्थ्यांनी आपली उत्तम कामगिरी करून सर्वोच्च बिंदू आत्मसात करण्यासाठी आवाहन केले.

गोदावरी फाउंडेशनच्या सदस्या डॉ. केतकी पाटील यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घ्या, परंतु त्यासोबतच करिअर संदर्भात गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे असे सांगितले. तसेच त्यांनी या कार्यक्रमाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले. या तीन दिवस चालणार्‍या गॅदरिंग मध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदविला. त्यात त्यांनी नृत्याविष्कार, गायन कौशल्य तसेच एकांकिका असे विविध प्रयोग सादर केले. विशेष आमंत्रित असलेले कलावंत सचिन कुमावत व पुष्पा ठाकूर यांनी मंचावर येऊन आनंद द्विगुणीत केला. त्यांनी अहिराणी गाण्यांवर धमाल केली त्यावेळेस विद्यार्थ्यांनी त्यांना भरघोस प्रतिसाद दिला.त्याचप्रमाणे कार्यक्रमादरम्यान मागच्या शैक्षणिक वर्षात उत्तम कामगिरी करणार्‍या यशवंत व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या स्नेहसंमेलनाचे समन्वयक प्रा. भावना झांबरे, तसेच त्यांच्यासोबत विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून संगणक विभागाचा चेतन शिंदे (जनरल सेक्रेटरी) व यंत्र विभागाचा हेमंत झांबरे (कल्चरल सेक्रेटरी) यांनी परिश्रम घेतले. त्यांच्यासोबत इतर समित्यांचे प्रमुख व विद्यार्थी यांनी प्राचार्य डॉ.विजयकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेहनत घेतली. कल्चरल नाईट च्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोशनी पाटील, वजीहा सय्यद, नरेंद्र महाजन, साक्षी बारी, प्रशांत पाटील व स्नेहा वडनेरे यांनी केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.