SBI चा दणका ! कर्जाच्या व्याजदरात केली वाढ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (State Bank of India) ग्राहकांसाठी मोठी बातमी आहे. कारण नववर्षाआधी (new year) SBI ने ग्राहकांना दणका दिला आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेली SBI ने कर्जाच्या व्याजदरात (Interest rate) वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांना आता जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

रिझर्व्ह बँकेच्या (Reserve Bank) रेपो रेटमध्ये (Repo rate) वाढ झाल्यांनतर आता सर्व बँकांची कर्ज महागणार आहे. त्याचप्रमाणे SBI ने मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट (Marginal Cost of Lending Rate) 0. 25 बेस‍िस पॉईंटने वाढ केली आहे. मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेटच्या आधारे बँक घर, वाहन तसेच कर्जांचे व्याजदर निश्चित करते. त्यामुळे कर्जावरील व्याजदर महाग झालं आहे. तसेच ज्यांनी आधीच गृहकर्ज घेतलं आहे त्यांना देखील जास्तीचं व्याज द्यावं लागणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.