समरसता महाकुंभचे भूमिपूजन व ध्वजारोहण…

0

 

फैजपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

समाजात आनंद निर्माण व्हावा, सर्व भेदांच्या भिंती तोडून एकरूप व्हावे, माणूस म्हणून आपण एकत्रित यावे, सर्व समाज सर्वसमावेशक असावा हा कार्यक्रमा मागचा उद्देश आहे. आपण सर्वांनी निमंत्रित न राहता आपला कार्यक्रम समजून स्वयंस्फूर्तीने सर्वांनी समरसता महाकुंभाला उपस्थित रहावे. असे आवाहन महामंडलेश्वर प.पू. जनार्दन महाराज यांनी केले आहे.

वढोदे येथील निष्कलंक धाम परिसरात दिनांक २९, ३०, ३१ डिसेंबर २०२२ रोजी सतपंथ चारिटेबल ट्रस्ट फैजपूर व अखिल भारतीय सनातन सतपंथ परिवार आयोजित समरसता महाकुंभाची तयारी प्रगतीपथावर असून आज दि.१५ डिसेंबर २२ रोजी सकाळी १० वा. निष्कलंक धाम येथे समरसता महाकुंभाचे भूमिपूजन तसेच समरसता ध्वजाचा रंग एका संप्रदायाचा न देता विविधतेत एकता असलेल्या अशा भगव्या रंगाच्या धर्म ध्वजाचे अनावरण संतांच्या उपस्थित संपन्न झाला यावेळी ते बोलत होते.

हृदयात समरसतेचा भाव असल्यास सर्व समाज एकत्र होतो. मानवास महामानव बनविण्यासाठी हा महाकुंभ आहे. एकात्मता निर्माण करण्यासाठी ही सर्जनात्मक कृती प.पू. जनार्दन हरिजी महाराज यांनी हाती घेतली असल्याचे स्वामीनारायण गुरुकुलचे शास्त्री भक्ती प्रकाशदासजी महाराज यांनी सांगितले.

सर्वांप्रती सामाजिक दृष्टिकोन असलेले प.पू जनार्दन महाराज यांनी सामाजिक एकात्मतेसाठी या महाकुंभाचे आयोजन केले ही आपणा सर्वांसाठी भाग्याची बाब आहे. धर्मामुळे समाजात शांती निर्माण होते त्यासाठी गुरु मार्गदर्शन करतात तेव्हा त्यांच्या शब्दांना प्रमाण मानून आपण तन मन धनाने समर्पित वृत्तीने सर्वांनी सहभाग द्यावा असे आवाहन करून या आयोजनासाठी प्रशासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे आ. शिरीष चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले. यावेळी रा.स्व. संघ पश्चिम क्षेत्र सदस्य निलेश गद्रे यांनीही मार्गदर्शन केले. उपस्थित संतांचा सत्कार मुखी कांतिभाई पटेल व राजुभाई पटेल नाशिक यांनी यावेळी केला.

यावेळी प.पु. सुरेशशास्त्री मानेकर बाबा(सावदा), प.पू. श्याम चैतन्यजी महाराज जामनेर, प.पू.स.शास्त्री भक्तीप्रकाशदासजी, प.पू. शास्त्री भक्तीकिशोर दास, हभप. मधुकर महाराज खानापूर, हभप रविंद्र महाराज हरणे, हभप. उद्धव महाराज, हभप नितीन महाराज, आ. शिरीष चौधरी, रा.स्वं. संघ पश्चिम क्षेत्र कार्यकारणी सदस्य निलेश गद्रे भुसावळ, सामाजिक सभासद प्रमुख प्रमोद दांडगे, ब्रम्हकुमारी मिरादीदी, मसाका माजी चेअरमन शरद महाजन, माजी मसाका संचालक नरेंद्र नारखेडे, डॉ. केतकी पाटील, माजी नगराध्यक्ष निलेश राणे, हभप प्रवीणदास महाराज, पवनदास महाराज, पूज्य राममनोहरदास महाराज, हभप धनराज महाराज अंजाळे, प्रांताधिकारी कैलास कडलग, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर आखेगांवरकर, परिसरातील सर्व समाज बांधवांचे प्रतिनिधी यांच्यासह गुजरात, मुंबई, पुणे, नाशिक व पंचक्रोशीतील भाविक भक्त तसेच सामाजिक, राजकीय पदाधिकारी, शासकीय व प्रशासकीय मंडळी यावेळी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.