विदगाव-ममुराबाद रस्त्यावर ट्रक पलटला; एक ठार, सात जखमी…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

रस्ते अपघाताची अजून एक घटना आज १५ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शहरा जवळ असणाऱ्या ममुराबाद विदगाव रस्त्यावरील फार्मसी महाविद्यालयाजवळ घडली आहे. ज्यात एका अज्ञात वाहनाने कट मारल्याने कापूस असलेला ट्रक पलटला. या अपघातात एक 20 वर्षीय तरुण जागीच ठार झाला आहे. त्याच्यासोबत ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील सर्व जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, गुरुवारी १५ डिसेंबर सकाळी ट्रकमध्ये कापूस भरून परत मुंगटी येथे जाण्यासाठी निघाला होता. हा ट्रक धुळे जिल्ह्यातील मुंगटी येथील (ट्रक क्रमांक एमएच १८ एए १०८०) मुजरासह यावल येथील डांभुर्णी येथे कापूस भरणे करण्यासाठी गेला होता. दुपारी ३ वाजेच्या सुमारास ममुराबाद ते वीदगाव रस्त्यावरील फार्मसी कॉलेजजवळ समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने कट मारला. यात चालकाचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक पलटला. या अपघातात राज रवींद्र अहिरे भिल (२०) रा. मुंगटी, ता. जि. धुळे हा तरुण जागीच ठार झाला, तर प्रमोद संभाजी पाटील (४०), भरत दगडू पाटील (३२), दिगंबर दिलीप पाटील (३०), रवींद्र बारकू भिल अहिरे (५०), जितेंद्र पवार (३५), निंबा दगडू पाटील (३६) आणि बुधा पाटील (६०) सर्व राहणार मुंगटी ता. जि. धुळे हे गंभीर जखमी झाले आहे. सर्व जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले असून, त्यांच्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.