सावखेडा येथील मंदिरातून ७० हजारांचा ऐवज लांबवला

0

पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा ;- : पाचोरा तालुक्यातील सावखेडा येथील भैरवनाथ मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी जवळपास ७० हजारांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना १ फेब्रुवारीला उघडकीस आली.

सावखेडा येथील भैरवनाथ मंदिरातील गाभाऱ्याच्या दरवाजाचे चोरट्यांनी कुलूप तोडून १ फेब्रुवारीला पहाटे ३.१५ ते ५ वाजेदरम्यान जवळपास ७० हजारांचा ऐवज लांबवून नेला. चोरट्यांनी गाभाऱ्यातील तिन्ही मूर्तीवरील चांदी मिश्रित धातूच्या ६४ हजार रुपये किमतीच्या २ किलो २५० ग्रॅमच्या तीन छत्र्या तसेच मंदिरातील ४ दानपेटींमधील ५ हजार ५०० रुपये रोख अस एकूण ६९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. ही घटना सकाळी ५ वाजेच्या सुमारास पुजारी रामचंद्र परदेशी यांच्या लक्षात आली. या बाबत मंदिर संस्थानचे सदस्य प्रकाश नारायण परदेशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.