मद्यधुंद कारचालकाने नेले स्कुटरला फरफटत, महिला गंभीर जखमी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कार चालकाने महिलेला धडक देत स्कुटरला एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याची भीषण घटना समोर आली आहे. ओडिशाची राजधानी भुवनेश्वर इथं बुधवारी रात्री ही घटना घडली असून, कार चालक नशेत असल्याचं सांगितलं जात आहे. स्थानिक लोकांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला पण त्यानं वेगानं कार पुढे नेली. याचा खळबळजनक व्हिडिओ समोर आला आहे.

पीटीआयच्या माहितीनुसार, भुवनेश्वरच्या स्मार्ट सिटीतील पाटिया-नंदनकनन रोडवर ही घटना घडली असून, कारने पहिल्यांदा दुसऱ्या एका कारला धडक दिली त्यानंतर एका महिलेच्या अंगावर कार घातली आणि बाजूला उभ्या असलेल्या एका स्कुटरला त्यानं फरफटत नेलं. त्यानंतर जेव्हा स्थानिक नागरिकांनी कारचालकाना थांबवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यानं कारचा वेग आणखीन वाढवला आणि ही स्कुटर सुमारे १ किमी पर्यंत फरफटत नेली.

 

ज्यावेळी कारनं स्कुटरला फरफटत नेलं जात होत. त्यावेळी रस्त्यावर मोठ्या ठिणग्या उडत होत्या. हे भयानक दृश्य या कारमागून जाणाऱ्या दुसऱ्या एका वाहनचालकाने मोबाईलमध्ये शूट केलं आहे. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

या घटनेत संबंधित महिला गंभीर जखमी झाली असून, तिच्या पायाला फ्रॅक्चर झालं आहे. या घटनेनंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कारचालक पाटिया भागातच राहत असून, तो कार चालवतांना दारूच्या नशेत होता. या घटनेनंतर पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली असून आरोपी कार चालकाला अटकही केली असून त्याची चौकशी केली जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.