लोकशाही न्यूज नेटवर्क
ज्योतिष शास्त्रानुसार ग्रहांच्या बदलत्या हालचालींना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते. त्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. एक फेब्रुवारीला बुध ग्रहाचे मकर राशीत संक्रमण झाल्यामुळे अनेकांचे टेन्शन वाढले आहे.
बुध ग्रहाला संवाद बुद्धी विवेक गणित तर्क आणि मित्राचे कारक मानले जाते. बुधाचा प्रभाव व्यक्तीच्या बोलण्याच्या स्वभावाने पडतो. यासोबतच व्यक्ती किती बुद्धिमान आणि विवेकशील असेल हे सुद्धा बुध ग्रहाच्या स्थितीने माहीत होते. जर तुमच्या कुंडलीतील बुध कमकुवत असेल, तर त्या व्यक्तीला गणित बुद्धिमत्ता आणि संवाद यांसारख्या अनेक समस्यांना सामना करावा लागणार. जाणून घेऊया बुध ग्रहाच्या संक्रमणाचा कोणत्या राशींवर काय परिणाम होणार आहे.
1. कर्क
बुध ग्रहाचे संक्रमण मकर राशि झाल्यामुळे कर्क राशीच्या लोकांना टेन्शन वाढणार आहे. आर्थिक अडचणी येऊ शकतात. कामात सतत नैराश्य येऊ शकते. नवरा-बायकोच्या नात्यात दुरावा येण्याची शक्यता आहे. तसेच काम पूर्ण होण्यास अनेक अडथळे येऊ शकतात.
2. धनु
मकर राशीत बुधाचे संक्रमण झाल्यामुळे आर्थिक जीवनात चढउताराचा सामना करावा लागेल. जीवनात अनेक कठीण प्रसंग येतील कामाच्या ठिकाणी वाद होण्याची शक्यता आहे. बोलताना शब्द जपून वापरा. काम पूर्ण होण्यात अडथळे येऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्या.