सावदा ;- सावदा येथे बस स्टॅन्ड जवळील असलेल्या दोन दुकानांना दि 8 रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान अचानक आग लागली यामुळे दुकानातील साहित्य जाळून खाक झाली.
एका गैरेंज मध्ये दुकान बंद असतांना अचानक आग लागली तेथून धुराचे लोट दिसू लागतात नागरिकांनी तिकडे धाव घेतली तो पर्यंत ही आग शेजारील दुकानात देखील पसरण्यास सुरवात झाली होती पण लागलीच सावदा नगर पालिकेच्या अग्नीशमन दलाने येऊन आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले व अखेरीस सुमारे अर्धातासा नंतर ही आग विझविण्यात यश आले .
या आगीत गैरेंज मधील साहित्य जुने टायर, व इतर वस्तू मिळून हजारो रुपयांचे नुकसान झाले तर शेजारील दुकानाचे देखील ही आग पसरल्याने नुकसान झाले येथे एकास एक लागून सुमारे 20 ते 22 दुकाना असून ही आग जास्त पसरली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. मात्र वेळेत ह्या आगीवर नियंत्रण मिळविल्याने मोठे नुकसान टळले आग विझविण्या साठी सावदा नगर पालिका अग्नीशमन दलाचे अविनाश पाटील व त्यांचे सहकारी तसेच उपस्थित नागरिक यांनी परिश्रम घेऊन आग आटोक्यात आणली.