तुषार गांधींचा थेट आरोप; महात्मा गांधींच्या हत्येसाठी सावरकरांनी गोडसेला बंदूक पुरवली…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी सावरकरांसंबंधी एक ट्विट केलं आहे. या ट्वीटमुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासंदर्भात केलेल्या विधानानंतर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.

भारत जोडो यात्रेमध्ये (Bharat Jodo Yatra) राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकर यांनी माफी मागितली होती, असं पत्र वाचून दाखवत आरोप केला होता. त्यानंतर भाजपने राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आणि राज्यभरात निदर्शनंही केली. तर दुसरीकडे, महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी एक ट्वीट केलं आहे.

‘सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर बापूंची हत्या करण्यासाठी नथुराम गोडसेला एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली’, असं ते ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

तुषार गांधी म्हणाले, सावरकरांनी फक्त ब्रिटिशांनाच मदत केली नाही, तर नथुराम गोडसेलाही बापूंची हत्या करण्यासाठी एक चांगली बंदूक मिळवून देण्यात मदत केली. बापूंच्या हत्येच्या दोन दिवस आधी गोडसेकडे कोणतंही शस्त्र नव्हतं.

तसंच, 1930 मध्ये महात्मा गांधी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचे प्रयत्न झाले होते. त्यावेळी प्रबोधनकार ठाकरे यांनी बापूंच्या सहकाऱ्यांना अकोला, विदर्भात बापूंचा खूनाच्या कटाबाबत सावध केले आणि बापूंचे प्राण वाचवले होते.

त्यानंतर प्रबोधनकार ठाकरे यांनी महाराष्ट्रातील सनातनी हिंदू संघटना आणि त्यांच्या नेत्यांना बापूंवर प्राणघातक हल्ल्यापासून रोखण्यासाठी सार्वजनिक इशारा सुद्धा दिला होता. सावरकर आणि हेडगेवार सनातनी हिंदूंचे नेते होते, त्यांना उद्देशून प्रबोधनकार ठाकरेंनी इशारा दिला होता. उद्धव ठाकरेंना याबद्दल आठवण करून दिली पाहिजे, असंही तुषार गांधी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.