थरारक.. स्वतःला पेटवून प्रेयसीला मारली मिठी

0

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क

औरंगाबादमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. प्रियकराने स्वतःला पेटवून घेत प्रेयसीला मिठी मारल्याची थरारक घटना आज दुपारी २ वाजेच्या दरम्यान पहाडसिंग पुरा परिसरात घडली. या घटनेत दोघे गंभीररित्या गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शासकीय रुग्णालय घाटी येथे उपचार सुरु आहेत.

गजानन मुंडे आणि पूजा साळवे अशी प्रेमीयुगुलाचे नाव आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील झुलॉजी विभागात दोघांची ओळख झाली. पूजा साळवेचे येथेच पीएचडी पूर्ण झाली असून ती सध्या फॉरेनसिक सायन्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून तासिका तत्वावर कार्यरत आहे. तर गजाजनची पीएचडी सुरु आहे. अनेक दिवसांपासून दोघांत प्रेम संबंध होते. मात्र मागील काही दिवसांपासून त्यांच्यात वाद झाला होता. यातूनच ही घटना झाल्याची माहिती आहे.

पूजाने माझा वापर केला, आता ती माझ्याशी लग्न करत नाही. तिने माझा वापर केला असा आरोप गजानन याने केला आहे. यातूनच तो पूजा शिकवत असलेल्या महाविद्यालयात गेला. येथे स्वतःला पेटवून घेत पूजाला त्याने मिठी मारली. दरम्यान काही दिवसांपूर्वी पूजाने पोलीस स्टेशनमध्ये गजानन आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार दिली असल्याची माहिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.