जळगाव गुन्हे शाखेने केला सौरभ चौधरी खुनाचा उलगडा… आरोपी ताब्यात…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दि. ०३/१०/२०२२ रोजी जळगाव येथील सौरभ चौधरी या तरुणाचा मृतदेह भादली येथील पाटावर आढळला होता. त्यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे उघडकीस आले होते. सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी यांनी भेट देवून पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील स्थानिक गुन्हे शाखा जळगाव यांना जळगाव सदर गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

मयत सौरभ यशवंत चौधरी व त्याचा साथीदार ईश्वर सपकाळे हे नेहमी सोबत राहत असून साधारण ते ५ दिवसापूर्वी या दोघांचा वाद झाला होता, अशी बातमी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना गुप्त माहिती मिळाली. याआधारे पथकासह ईश्वर नथ्थु सपकाळे याचा शोध घेतला असता तो दि. ०३/१०/२०२२ रोजी सकाळ पासून घरी नव्हता. त्यावेळी त्याचे घरच्यांना त्याबाबत विचारपुस केली असता तो कुठे गेला याबाबत सांगता येणार नाही असे सांगीतले.

ईश्वर नथ्थू सपकाळे याचा मुळ कानळदा गावात शोध घेत असतांना तो आज दि. ०६/१०/२०२२ रोजी कानळदा शिवारात मिळून आला. व त्याला ताब्यात घेण्यात आला. त्यास सदर प्रकरणी विचारपुस केली असता ईश्वर सपकाळे याने मयत सौरभने आपल्याकडून उसनवार पैसे घेतले होते. दिनांक ०२/१०/२०२२ रोजी ०९.३० वाजेच्या सुमारास मोटार सायकल ते दोघे श्रीराम चौक जैनाबाद येथून भादली येथे गेले, येथील पाटचारीवर बसून गप्पा मारत असतांना सौरभ चौधरी याला आपण दिलेले हातउसनवारीचे पैसे मागितले असता आमच्यात वाद झाला व त्यात पाटचारी जवळ धारदार शस्त्र व लोखंडी रॉडने त्याला जीवे मारल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिली.

याप्रकरणी तपासासाठी पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील सपोनि जालिंदर पळे, पो.उप.नि अमोल देवढे, स.फी रवि नरवाडे, पो.ह संजय हिवरकर, राजेश मेढे, जितेंद्र पाटील, लक्ष्मण पाटील, महेश महाजन, अक्रम शेख, संदिप सावळे, पो.ना रणजीत जाधव, विनोद सुभाष पाटील, किशोर राठोड, नितीन वावोस्कर, प्रितम पाटील, ईश्वर पाटील, मुरलीधर बारी, रमेश जाधव स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव यांचे पथक नेमण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.