अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात ; अब्दुल सत्तारांचे वादग्रस्त विधान

0

मुंबई , लोकशाही न्यूज नेटवर्क

अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. असे वादग्रस्त विधान कृषिमंत्री अब्दुल सत्तर यांनी केल्याने त्यांच्या या विधानाने संताप व्यक्त होत आहे. अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगावमधील नुकसानीची पाहाणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले . .शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही कृषी मंत्री अब्दुल सत्तार त्यांनी नमूद केले.
सत्तार यांच्या या वक्तव्याविरोधात आज विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी जोरदार आंदोलन करत घोषणाबाजी केली.

ते म्हणाले कि, माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचे फार काही नुकसान झालेले नाही. काही प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठे नुकसान नसले तरी पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार आणि राज्य सरकार हे असंवेदनशील आहे.कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला असून शेतकऱ्यांच्या बाबतची कृषीमंत्र्यां​​​​​​ची भाषा ही दिलासादायक नाही, असे ते म्हणाले.
एकट्या सिल्लोडमध्ये 3 जणांनी जीवन संपविले. नैतिक जबाबदारी घेत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.