‘द एलिफंट व्हिस्पर्स’ , ‘बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्म’ ; भारताला मिळाला दुसरा ऑस्कर

0

लॉस एंजेलिस , लोकशाही न्यूज नेटवर्क
द एलिफंट व्हिस्परर्सने सर्वोत्कृष्ट माहितीपट लघुपटने बाजी मारली असून भारताने दुसरा ऑस्कर जिंकला.कार्तिकी गोन्साल्विसने याचे दिग्दर्शन केले आहे. तर गुनीत मोंगा ने निर्मित केला होता. पुरस्कार स्विकारताना गुनीत म्हणाली की- 2 महिलांनी भारतासाठी हे करून दाखवले. हा पुरस्कार माझ्या देशासाठी समर्पित आहे.

ऑस्कर पुरस्कार प्राप्त झालेल्या गुनीत यांचा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘पिरियड एंड ऑफ सेंटन्स’ या चित्रपटाला 2019 मध्ये सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मच्या श्रेणीत ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ‘द एलिफंट व्हिस्पर्स’ या चित्रपटात बोमन आणि बेली या दक्षिण भारतीय जोडप्याची कथा आहे. जे रघु नावाच्या अनाथ हत्तीची काळजी घेतात. मानव आणि प्राण्यांमधील नातं या चित्रपटातून दाखविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.