रावेर लोकसभेत माजी आमदार संतोष चौधरींचा बंडखोरीचा इशारा

0

चार पक्षांचे मला बोलावणे : ‘त्या’ पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार

भुसावळ ;- आमच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने अनेकवेळा अन्यायच केला तरीही माझ्या हृदयात शरद पवारांचे स्थान कायम आहे. अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा असून पक्ष आपल्याला उमेदवारी जाहीर करेल अशी अपेक्षा आहे. अन्यथा येत्या 24 तारखेला आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत, अशी घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी कार्यकर्त्यांच्या निर्धार मेळाव्यात केली आहे. त्यामुळे रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात तिढा निर्माण झाला आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची उमेदवारी श्रीराम पाटील यांना जाहीर करण्यात आली आहे. त्यांचा सामना भारतीय जनता पक्षाच्या खासदार व एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांच्याशी आहे. मात्र, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारीसाठी अद्यापही इच्छुक आहोत, पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी आपण उमेदवारी अर्ज भरणार आहोत असा इशारा दिला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा भुसावळ येथे तेली समाज मंगल कार्यालय येथे आयोजित केला होता. तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौधरी म्हणाले, खरंतर 2009 मध्येच माझी लोकसभा निवडणुक लढविण्याची इच्छा होती मात्र षडयंत्र रचून मला अडचणीत आणले गेले. चौधरी परिवाराचा पक्षाने फक्त वापर करून घेतला. पंधरा वर्षात आमच्या परिवाराने खून भोगले आहे. पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. आता तर लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नव्हती. पण शरद पवारसाहेबांनीच मला याबाबत विचारणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता.
रविंद्रभैय्या पाटील व मी अशी दोनच नावे होती. नंतर इतर नावे समाविष्ट होत गेली. शेवटी श्रीराम पाटील पक्षात नसताना त्यांचे नाव घोषित झाले हे पहिल्यांदाच पक्षात घडले. मी उद्या मुंबईनंतर दिल्ली येथे जाईल, काय घडामोडी होतील आपण पाहणार आहोत. मात्र, पक्षाचे नेते शरद पवारला मुक्ताईनगरला येत आहेत तेथील जाहीर सभेत उमेदवारी बदलाची घोषणा करतील अशी अपेक्षा आहे. कारण या आधी दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या सभेतच शिवसेनेना उमेदवार बदलविला होता.

मला चार पक्षाची ऑफर
आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत संतोष चौधरी म्हणाले, चार पक्षांचे मला बोलावणे आहे. शिवाय त्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारीचा ए. बी. फॉर्मवर माझीच सही असेल. येत्या 24 तारखेला मी रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.