अवैध्य वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात, गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील मेहरूण तलाव काठाला लागूनच जैन गेट जवळून विनापरवाना ट्रॅक्टर मधून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले. एमआयडीसी पोलीस ठाण्यात ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मेहरूण तलावाच्या बाजूला असलेल्या जैन यांच्या गेटजवळून ट्रॅक्टर मधून विनापरवाना वाळू वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तलाठी राहुल सुभाष कुमावत यांना मिळावी.

त्यानुसार त्यांनी पथकासह शनिवारी (ता.४) दुपारी १ वाजता केली. ट्रॅक्टर क्रमांक (एमएच १९-१९०९) या निळया रंगाच्या ट्रॅक्टरमधून वाळू वाहतूक करत असल्याचे आढळून आले. वाळूचे भरलेले ट्रॅक्टर महसूल पथकाने जप्त केले. याप्रकरणी ट्रॅक्टर चालक योगेश रामचंद्र कोळी (रा. आदर्शनगर, जळगाव) या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक नितीन पाटील तपास करीत आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.