बिल्डर नरेश कराडांवर दुसरा गुन्हा दाखल, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कराडा कन्स्ट्रक्शनचे बिल्डर नरेश कराडा यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कराडा यांच्याविरोधात जेलरोड परिसरातील एका प्लॉटच्या व्यवहारापोटी ४ कोटी रिप्यांच्या फसवणुकीचा गुन्हा उपनगर पोलिसात दाखल झाला आहे. कराडा सध्या पोलीस कोठडीत आहेत. या गुन्ह्याचा तपास शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे वर्ग करण्यात आलाय. पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सुनील देवकर (रा. बळीराम पेठ, जळगाव)यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली आहे. यानुसार त्यांचे आजोबा गजानन देवकर (९०) यांचा आणि नरेश कारडा यांच्यात २००७ पासून व्यावसायिक संबंध आहे. या संबंधातून त्यांनी २०१७ मध्ये कारडा यांच्या मालकीचा जेलरोडच्या पंचक शिवारातील प्लॉटचा दोघांमध्ये व्यवहार झाला होता. त्या व्यवहारापोटी देवकर यांच्या आजोबांनी ४ कोटी रुपये दिले होते. तर कारडा यांनी त्या मिळकतीचे खरेदीखत करण्यासाठी वेळ मागून घेतला.

यादरम्यान कारडा यांनी २०१९ मंडे प्लॉटची परस्पर विक्री करीत देवकर यांच्या आजोबांची फसवणूक केली. कारडा यांनी देवकर यांना दुसरी मिळकत न देता त्यांची ४ कोटी रुपयांना फसवणूक केली. वेळोवेळी पैशांची मागणी करूनही कारडा यांनी पैसे दिले नाहीत. अखेर देवकर यांनी उपनगर पोलिसात तक्रार दिली.

दरम्यान ज्या गुंतवणूकदारांची कारडा कन्स्ट्रक्शनच्या माध्यमातून फसवणूक झाली असेल त्यांनी गंगापूर रोडवरील पोलीस आयुक्तालयातील शहर आर्थिक गुन्हेशाखेकडे तक्रार द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्तालयातर्फे करण्यात आले आहे. बहुतेक ग्राहकांनी फ्लॅट किंवा गाळ्यासाठी कारडा कन्स्ट्रक्शनकडे खरेदीसाठी गुंतवणूक केली आहे. त्यातील बहुतांशी रक्कम ही रोख स्वरुपात दिलीय.

Leave A Reply

Your email address will not be published.