संभाजीराजेंनी शिवसेनेची ऑफर धुडकावली

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

राज्यसभेच्या निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीसह सर्व पक्षांनी आपल्याला मत द्यावे, असे आवाहन केले आहे. ते अपक्ष उमेदवार आहेत. मात्र संभाजीराजेंनी शिवसेनेत यावे, अशी ऑफर देण्यात आली. संभाजीराजे आज मातोश्रीवर जाणार होते. पण शिवसेनेची ऑफर संभाजीराजेंनी धुडकावली असल्याचे वृत्त आहे.

येत्या जुलै महिन्यात महाराष्ट्रातील सहा राज्यसभा खासदारांचा कार्यकाळ संपत आहे. यातील पाच जागांवरील उमेदवारांच्या नावाची यादी अंतिम टप्प्यात आहे. मात्र, सहाव्या जागेवरून राज्यात राजकारण चांगलंच रंगलेलं दिसतंय.

राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून संभाजीराजे छत्रपती यांची टर्म संपली आहे. आता स्वराज्य नावाच्या संघटनेमार्फत त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करत राज्यातील सर्व आमदारांना पाठिशी उभे राहण्याचे आवाहन केले आहे. राष्ट्रवादीने संभाजीराजेंना पाठिंबा देण्याचं जाहीर केलं. मात्र शिवसेनेला अद्याप हा प्रस्ताव मान्य नाही.

मातोश्री वर येऊन शिवबंधन बांधा आणि पठिंबा मिळवा, असा निरोप मुख्यमंत्र्यांनी पाठवल्याची महिती मिळत आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत संभाजीराजेंना संधी देण्यात त्यामुळे राजकारण आणखी तापणार असून संभाजीराजेंनी ही ऑफर अद्याप स्वीकारलेली नाही. त्यातच आता संभाजीराजे सकाळीच कोल्हापूरकडे रवाना झाल्याची माहिती मिळतीय.

संभाजी राजे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ‘मातोश्री’वर जाणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अपक्ष निवडणूक लढवण्यावर ते अद्याप ठाम आहेत. शिवसेनेत पक्ष प्रवेशाला संभाजी राजेंचा सुरुवातीपासून विरोध होता. सेनेची ऑफर ते स्वीकारणार की नाही, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. मात्र, आता संभाजी राजे मुंबईतून पहाटेच कोल्हापूरला निघाल्याची माहिती मिळत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.