जळगावात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रम

0

जळगाव;- जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जळगाव शहरात सामाजिक वनीकरण विभाग आणि श्री अष्टविनायक शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मिशन लाईफ अंतर्गत भव्य सायकल रॅली काढण्यात आली. सायकल रॅलीची सुरुवात शिवतीर्थ मैदान येथे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. रॅली चित्रा चौक, टॉवर चौक, नेहरु पुतळा, कोर्ट चौक, रिंग रोड, आकाशवाणी, सिंधी कॉलनी मार्गे लांडोरखोरो वनोद्यान येथे समारोप करण्यात आला. याठिकाणी मिशन लाईफची सप्तसूत्री कचरा कमी करा, ई-कचरा कमी करा, निरोगी जीवनशैली अंगीकारा, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा, एकेरी वासाच्या प्लास्टिकला नाही म्हणा, पाणी वाचवा, उर्जा वाचवा याबाबत प्रचार करण्यात आला. या रॅलीत सर्व वयोगटातील 100 पेक्षा अधिक नागरिकांनी सहभाग नोंदविला.

लांडोरखोरी उद्यानात उपस्थितांसह जिल्हाधिकारी अमन मित्तल, उपवनसंरक्षक, जळगाव (प्रा). विवेक होशिंग, उपवनसंरक्षक, यावल (मा) जमीर शेख, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव भरत शिंदे व सायकल पटु यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले. त्यानंतर उपस्थित अधिकारी/कर्मचारी यांनी पर्यावरण दिनानिमित्त मिशन लाईफची सामुहिक प्रार्थना घेतली. तसेच गणेश कॉलनी, जळगाव येथे उपस्थित नागरिकांना त्यांच्या आवडीनुसार बेल, निंब, चाफा, आवळा, वड, करंज, आंबा इत्यादी प्रजातीचे वृक्षांचे रोपांचे मोफत वाटप करण्यात आले. ज्यांनी मोफत रोपे घेतली त्यांनी सदर रोपांचे संगोपन व देखभाल करण्याची हमी घेतली. आझादी का अमृत महोत्सवानिमित्त शहरातील 75 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक आत्माराम नागराज पाटील यांचे हस्ते वृक्षारोपण करून विविध प्रजातींचे 75 वृक्षांची लागवड करण्यात आली. या वृक्षाची संरक्षण व देखभालीची जबाबदारी कॉलनीतील नागरिकांनी घेतली. असे भरत शिंदे, विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण विभाग, जळगाव यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.