अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी जप्त वाहनांची १३ जून रोजी विक्री

0

जळगाव ;- पाचोरा तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, पाचोरा येथे ठेवण्यात आले आहेत. या वाहनमालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत. परंतु संबंधित वाहन मालक यांनी दंडात्मक रक्कमेचा भरणा अद्याप केलेला नाही. त्यामुळे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १७६ ते १८४ मधिल तरतुदीनुसार जप्त केलेल्या वाहनांवर जमीन महसुलाची थकबाकी समजून जप्त वाहनांचा लिलाव करुन लिलावातून प्राप्त होणारा महसुल शासनास जमा करणे आवश्यक आहे.

त्यानुसार पाचोरा तहसील कार्यालयात अटकावून ठेवलेल्या जंगम मालमत्तेचे उप प्रादेशिक परीवहन अधिकारी, जळगांव यांचेकडुन मुल्यांकन प्राप्त झाले आहे. तसेच या मुल्यांकनानुसार उपविभागीय अधिकारी, पाचोरा भाग, पाचोरा यांनी लिलाव करण्यास मंजुरी दिली आहे.

तरी अटकावून ठेवलेल्या वाहनांच्या मालकांनी विक्रीकरीता निश्चित केलेल्या तारखेपूर्वी देय रक्कम शासन जमा करावी. अन्यथा या वाहनांची तहसिल कार्यालय, पाचोरा येथे १३ जून, २०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता लिलावाव्दारे विक्री करण्यात येईल. व अशा तऱ्हने केलेली विक्री कायम होण्यास अधीन राहील. असे प्रवीण चव्हाणके, तहसिलदार, पाचोरा यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.