मुंबई ;- अभिनेता बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडल्याची माहितीनुसार, दोन अज्ञात दुचाकीवरून सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर आले होते. तेव्हा त्यांनी तिथे ३-४ राऊंड फायर केल्याची माहिती आहे. हा गोळीबार कोणी केला याबाबत सध्या काहीही माहिती नाही.
पहाटे ४.५५ वाजता ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. सध्या पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त सलमान खानच्या घराबाहेर आहे. पोलिस सलमान खानकडून याबाबतची माहिती घेत आहेत. तसेच, सुरक्षा रक्षक, खाजगी सुरक्षा रक्षकांकडूनही माहिती घेतली जात आहे. फॉरेन्सिक टीमही याठिकाणी दाखल झालेली आहे.