सलमान प्रेमात न पडल्याने केले नाही लग्न ; वडील सलीम यांचे वक्तव्य

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
अवघ्या देशातील सलमान खानच्या चाहत्यांना सलमानने लग्न का केले नाही हा प्रश्न सतावत आहे . मात्र तो प्रेमातच पडला नसल्याने त्याने लग्न केले नाही असे वक्तव्य त्याचे वडील सलीम यांनी केल्याने सलमानच्या लग्नाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. सलमान खान अजून प्रेमात पडलेला नाही, त्यामुळे सलमान अजून लग्न करू शकला नाही आणि त्यामुळेच त्याचं लग्न होत नाही .

लग्न न होण्यास सलमान स्वतः जबाबदार असल्याचं सलीम खान यांनी स्पष्टपणे म्हटले आहे . आहे.सलमान प्रेमात पडला तर तो लवकरच लग्न करू शकतो. सलमान खानने बॉलिवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत आणि अनेक अभिनेत्रींसोबत त्याने कामही केलं आहे, मात्र ज्यांना ज्यांना अभिनेत्याने डेट केलं आहे त्या सगळ्याच लग्नबंधनात अडकल्या आहेत.
सलमान खानने अद्याप लग्न केलेलं नाही. पण आता हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे की, सलमान लग्न करतो की नाही आयुष्यभर तो बॅचलर राहणार आहे.याकडे आता त्याच्या चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.