प्रजासत्ताकदिनी होणार पहिली नेझल व्हॅक्सिन ‘इन्कोव्हॅक लस देण्यास प्रारंभ

0

लोकशाही न्युज नेटवर्क
भारत बायोटेकने विकसित केलेली नाकाद्वारे देण्यात येणारी पहिली नेझल व्हॅक्सिन ‘इन्कोव्हॅक’ 26 जानेवारीपासून लोकांपर्यंत पोहोचविण्यास सुरवात करण्यात येणार आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कृष्णा इला यांनी शनिवारी ही माहिती दिली.

नाकावाटे घ्यायची ही लस बुस्टर डोस म्हणून घेता येणार आहे. सुरुवातीला ही लस खासगी रुग्णालयात मिळणार असून प्रति डोस 800 रुपये तर सरकारी रुग्णालयात प्रति डोस 325 रुपये मोजावे लागणार आहेत. नेझल व्हॅक्सिन 18 वर्षांवरील व्यक्तींनाच घेण्याची परवानगी आहे.

सध्या उपलब्ध असलेली कोरोना लस यापूर्वी इंजेक्शनद्वारे टोचून घ्यावी लागत होती. पण भारत बायोटेकने देशात निर्माण केलेली इंट्रानेझल व्हॅक्सिन नाकावाटे घ्यायची आहे. भारत बायोटेकच्या या ‘नेझल व्हॅक्सिन’ साठी 23 डिसेंबरलाच केंद्राने परवानगी दिली होती. तसेच भारत सरकारच्या कोविड लसीकरण मोहिमेतही तिचा समावेश करण्यात आला आहे. नाकात असलेल्या म्युकोसाद्वारे कोरोना आणि व्हायरल इन्फेक्शन होतात. नेझल व्हॅक्सिन थेट म्युकोसातच रोगप्रतिकारशक्ती निर्माण करते.

Leave A Reply

Your email address will not be published.