कोरोना : चीनमध्ये एका आठवड्यात १३ हजार नागरिकांचा मृत्यू

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
चीनमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकांना कोरोना विषाणूची लागण होत आहे. चीनमध्ये आता 13 ते 19 जानेवारी दरम्यान जवळपास 13,000 नवीन कोविड-संबंधित मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे आता चीनमध्ये कोरोना विषाणूने भयानक रूप धारण केले आहे.

तज्ज्ञांच्या मते, देशभरात संसर्गाची लाट आधीच शिगेला पोहोचली आहे.चीन सुरुवातीपासूनच कोरोनामुळे मृत्यूची संख्या लपवत आहे. कोरोना महामारी पसरली तेव्हापासून चीनने सांगितले की, येथे फक्त 5 हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात एका दिवसात पाचहून अधिक मृत्यू झाल्याची नोंद होत असल्याचे अधिकाऱ्यांचे मत आहे.

मात्र अंत्यविधीसाठी लागलेल्या लांबच लांब रांगा आणि हॉस्पिटलमध्ये जमलेली गर्दी काही वेगळेच सांगत आहे. काही आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे की, चीनमध्ये यावर्षी 10 लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू होऊ शकतो.चायना सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनचे मुख्य महामारीशास्त्रज्ञ वू झुन्याओ यांनी 21 जानेवारी रोजी वेइबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सांगितले की, नजीकच्या भविष्यात दुसरी कोविड लाट येण्याची शक्यता नाही. वू म्हणाले की पुढील दोन किंवा तीन महिने कठीण आहेत. कारण 80% लोकांना संसर्ग झाला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.