हेमंत महाले
निजामपूर :- साक्री तालुक्यातील निजामपूर येथे कै.दादासाहेब बाळुशेठ महाडूशेठ विसपुते यांच्या स्मृतिपित्यर्थ बसस्थानक परिसरातील प्रवाशासाठी मोफत पाणपोई चे निजामपूर जैताणे येथील उदघाटन धनाई पुनाई विधायक मंडळ संस्थेचे अध्यक्ष, व माजी पंचायत समितीचे उपसभापती नंदकुमार विसपुते तथा ग्रामपंचायत सदस्य सुरेंद्र विसपूते, विविध कार्यकारी सोसायटीचे मा.चेअरमन शनाभाऊ भदाणे, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
बसस्थानक येथील एकविरा ट्रेडर्स जवळ हि पाणपोईची सेवा सुरू करण्यात आली आहे.उन्हाची तिव्रता व पिण्याच्या पाण्याची टंचाई लक्षात घेता हा उपक्रम राबविला जात असुन परिसरात कौतूक केले जात आहे.
या वेळी पंडित बाविस्कर, रघुवीर खारकर,गोकुळ पाटील, सुरेंद्र विसपुते, दौलत जाधव, मुख्याध्यापक सी. जी. दुसाणे,नंदकुमार पाटील,अनिल सोनवणे, गणेश निकुंभ, कल्पेश अहिरे आदी मान्यवर उपस्थित होते.