हेमंत महाले
निजामपूर :- साक्री तालुक्यातील जैताणे येथे थोर समाजसेवक, व्यापारी, विचारवंत, समाजसुधारक, लेखक आणि जाती विरोधी लढा देणारे समाजसुधारक, शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेवून पुरोगामी विचारांची मांडणी करणारे, आजही देशभर लोकप्रिय असलेले आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या ज्योतिराव गोविंदराव (ज्योतिबा) फुले यांची आज 11 एप्रिल जयंती साजरी करण्यात आली.
जैताणे ग्रामपालीकेच्या सभागृहात अर्धाकृती पुतळयाचे पुजन मा.पंचायत समीती सदस्य अशोक मुंजगे तथा समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी जेष्ठ कार्यकर्ते प्रकाश पाटिल,जि.प.सदस्य डा.नितीन सुर्यवंशी,ग्रा.प.सदस्य सत्तार मन्हीयार,गणेश न्याहळदे,समाधान महाले,राकेश शेवाळे,दैलत जाधव,सतिष बाविस्कर, किशोर बागूल,मनोज खारकर,हेमंत महाले,ग्रामपंचायत लिपिक यादव भदाणे,तुकाराम खलाणे,अनिल बागूल आदि नी अभिवादन केले.कार्यक्रम यशस्वीते साठी ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.