अनिल परबांना मोठा धक्का, साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश

0

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अनिल परब आणि सदानंद कदम यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांचे दापोलीमधील साई रिसॉर्ट पडणार आहे. साई रिसॉर्ट अनधिकृत असल्याचं हायकोर्टामधील सुनावणीदरम्यान स्पष्ट झालं आहे. त्यामुळे अनिल परब आणि सदानंद कदम यांना चार आठवड्यात हा रिसॉर्ट पाडावा लागणार आहे. याबाबतचे मुंबई हायकोर्टाने आदेश दिले आहेत.

२०२० मध्ये भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या रिसॉर्ट प्रकरणी तक्रार दाखल केली होती. यावरून सोमय्या आणि अनिल परब यांच्यात मोठे वाद सुरु होते.   त्यानंतर आज मुंबई हायकोर्टाने रिसॉर्ट चार आठवड्यात पाडण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे हा उबाठा नेते अनिल परब यांच्यासाठी मोठा धक्का आहे.

तसेच मागे खेड जिल्हा कोर्टाने दापोलीतील साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. हे रिसॉर्ट आधी अनिल परब यांच्या मालकीचे होते. त्यानंतर हे रिसॉर्ट त्यांचे मित्र आणि राजकीय नेते सदानंद कदम यांना विकण्यात आले होते. बांधकाम करताना अनेक नियमितता आढळल्या होत्या. त्यानंतर मागील वर्षी जिल्हाधिकाऱ्यांनी  रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते.

दरम्यान राष्ट्रीय हरित लवादाने एक तज्त्र समिती स्थापन केली होती. समितीने रिसॉर्टची पाहणी केली होती. यामुळे सीआरझेड नियमांचे उल्लंघन होत असल्याचे म्हणत जागा पूर्वीप्रमाणे करण्याची शिफारस समितीकडून करण्यात आली होती. याप्रकरणी रिसॉर्टचे मालक सदानंद कदम यांनी कोर्टात धाव घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.