मोठी कारवाई : अश्लील कंटेंट दाखवणारे OTT प्लॅटफॉर्म ब्लॉक

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मोदी सरकारने मोठी कारवाई केल्याने अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या ओटीटी प्लॅटफॉर्मचे धाबे दणाणले आहेत. आजकाल देशात कित्येक ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्रासपणे अश्लील अन् हिंसक कंटेंट दाखवला जातो. मात्र आता अशा प्लॅटफॉर्म्सवर मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. आयबी मंत्रालयाने सादर कारवाई केली आहे. अश्लील कंटेंट दाखवणाऱ्या 18 ओटीटी प्लॅटफॉर्म्सना सरकारने ब्लॉक केलं आहे. तसेच अशा वेबसाईट्स, अ‍ॅप्स आणि या ओटीटींचे सोशल मीडिया हँडलही ब्लॉक करण्यात आले आहेत.

ओटीटी प्लॅटफॉर्म्सच्या 19 वेबसाईट्स, 10 अ‍ॅप्स आणि 57 सोशल मीडिया हँडल्सना ब्लॉक करण्यात आलं आहे. यापूर्वी भारत सरकारने गेल्या वर्षी नेटफ्लिक्स, डिज्नी आणि इतर मुख्य ओटीटींना आपल्या कंटेंटचं स्वतंत्रपणे मॉडरेशन करण्यास सांगितलं होतं.

या ओटीटींचा समावेश

रॅबिट (Rabbit)

निऑन एक्स व्हीआयपी (Neon X VIP)

हंटर्स (Hunters)

हॉट शॉट्स व्हीआयपी (Hot Shots VIP)

मोजफ्लिक्स (Mojflix)

मूडएक्स (MoodX)

बेशरम्स (Besharams)

अनकट अड्डा (Uncut Adda)

ट्रिफ्लिक्स (Tri Fliks)

एक्स प्राईम (X Prime)

न्यूफ्लिक्स (Nuefliks)

प्राईम प्ले (Prime Play)

चिकूफ्लिक्स (Chikooflix)

फुगी (Fugi)

एक्स्ट्रामूड (Xtramood)

ड्रीम्स फिल्म्स (Dreams Films)

वूव्ही (Voovi)

येस्मा (Yessma)

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.