मुंबई ;- मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरने बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला असून ‘मिमी’ सिनेमात तिने सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका साकारली. यासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारही मिळाला आहे .
आता सईला आणखी एका सिनेमाची लॉटरी लागली आहे. बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध कंपनीकडून तिला ही ऑफर आली आहे.सईने फोटो शेअर करत ही माहिती दिली असून आता ती आणखी एका धमाक्यासाठी सज्ज आहे.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध एक्सेल एंटरटेन्मेंटकडून सईला सिनेमाची ऑफर आली आहे. एक्सेल एंटरटेन्मेंट ही कंपनी रितेश सिधवानी आणि फरहान अख्तर यांची आहे. ‘दिल चाहता है’, ‘डॉन’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट या बॅनरखाली बनले आहेत. सईलाही त्याच्या आगामी सिनेमाची ऑफर मिळाली आहे. प्रोडक्शन कंपनीकडून तिला मिळालेल्या लेटरचा फोटोही तिने शेअर केलाय. यात तिने सिनेमाचं नाव मात्र लपवलं आहे.