जी. एच. रायसोनी महाविद्यालयात “इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा”

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

मनातील विचारांना आकाराचे रूप देत विद्यार्थ्यांनी शाडू मातीपासून गणेशमूर्तीची अनेक रूपे साकारून आपल्यातील अनोख्या कलाविष्कारांचे सादरीकरण केले. निमित्त होते जी. एच. रायसोनी इस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अॅन्ड बिजनेस मॅनेजमेंट महाविद्यालयातील बीसीए विभागातर्फे आयोजित “इको फ्रेंडली मंगलमूर्ती स्पर्धा” म्हणजेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्याच्या स्पर्धेचे. जी. एच. रायसोनी इस्टीट्युटच्या कनिष्ट महाविद्यालयातील सभागृहात हि दोन दिवसीय स्पर्धा पार पडली.

याप्रसंगी रायसोनी इस्टीट्युटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करतांना त्यांनी नमूद केले कि, बीसीए विभागाचे कौतुक अश्यासाठी कि त्यांनी या युवकांना पर्यावरणाचे धडे दिले. कारण भविष्यात त्यांच्याच खांद्यावर देश घडविण्याची जबाबदारी आहे. आणि अशा कामात महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी पुढाकार घ्यावा हे अभिनंदनीय आहे. त्यानी यावेळी उपक्रमाचे कौतुक करताना, विद्यार्थ्यांनी मातीचे गणपती बनवावे आणि इतरांनाही प्रेरित करण्याचे आवाहन केले. तसेच प्लास्टिकचा वापर टाळून आपला परिसर व आपले शहर स्वच्छ राखण्याचे आवाहन करत युवकांचा या स्पर्धेला मिळालेला उत्साह पाहून आनंद झाल्याचे सांगितले.

यावेळी स्पर्धकांनी अवघ्या वीस मिनिटांत शाडूच्या मातीची मूर्ती सहजतेने साकारल्या. वेगवेगळ्या रूपांतील गणेशमूर्ती स्वतःला करता आल्याचा आनंद या युवकांच्या चेहऱ्यावर होता. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी स्वत: पर्यावरणपूरक गणपती तयार करून ते आपल्या घरी स्थापन करावेत, या उद्देशाने ही स्पर्धा घेण्यात आली होती. यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला. या स्पर्धेची संकल्पना बीसीए विभागप्रमुख प्रा. कल्याणी नेवे यांची होती तर परीक्षण प्रा. रफिक शेख, प्रा. सरोज पाटील व योगिता पाटील यांनी केले. तसेच स्पर्धेच्या समन्वयिका मानसी दुसे, अश्विनी भोळे व प्रा.वर्षा सुरळकर या होत्या. सदर कार्यशाळेचे यशस्वीरीत्या आयोजन केल्याबद्धल रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी व अॅकेडमिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी अभिनंदन केले.

स्पर्धेतील विजेते

प्रथम- चंदन शिंपी (बीसीए), द्वितीय- धनश्री जाधव (बीटेक), तृतीय- तन्मय जी. पाटील (बीबीए), दिशा महाजन (बीटेक), प्रकाश जैन (बीबीए)

Leave A Reply

Your email address will not be published.