गोदावरी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये बाप्पाच्या आगमनाची चाहूल

0

जळगाव – गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव येथे बाप्पाच्या आगमनची पूर्वतयारी म्हणून इको फ्रेंडली गणपती बनवणे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. गणपती बनविण्यासाठी शाडूच्या मातीचा प्रामुख्याने वापर करण्यात आला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने भाग घेतला पर्यावरणपूरक गणपती स्थापन करूया… या उद्देशाने शाडू मातीच नव्हे तर विद्यार्थ्यांनी विविध पाने, फुले, कागद, फळभाज्या त्यांच्यापासून गणपती बाप्पाची प्रतिमा बनवली. या कार्यक्रमासाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.