“भारत रत्न परत करा”, अशी घोषणाबाजी करत सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर आंदोलन

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या विरोधात माजी मंत्री बच्चू कडू (Bacchu kadu) यांनी आंदोलन छेडले आहे. यांच्या नेतृत्वातील प्रहार संघटना अधिकच आक्रमक झाली आहे. आज सचिन तेंडुलकर यांच्या निवासस्थानाबाहेर प्रहार संघटनेनं जोरदार निदर्शने केली आहे. “देव आमचा जुगार खेळतो”, “परत करा”, “परत करा’, “भारत रत्न परत करा”, अशी घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पोलिसांनी आधी बच्चू कडू यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली असता, बच्चू कडू यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिल्याने, पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या समर्थकांना ताब्यात घेतलं आहे. सचिन तेंडुलकरच्या घराबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी एका जुगाराच्या जाहिरातीत काम केले. आणि त्याचमुळे सचिन यांच्या निशाण्यावर आले. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी आक्षेप घेतला आहे. सचिन तेंडुलकर भारतरत्न आहेत. त्यांना देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. ते जुगाराला प्रोत्साहन देणारी जाहिरात कशी करू शकतात? असा सवाल करत बच्चू कडू यांनी सचिन तेंडुलकर यांना कडाडून विरोध केला. बच्चू कडू यांनी सचिन यांना केल्लेल्या जाहिरातीबद्दल मॅगी मागण्यास सांगितली होती पण, सचिन यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. या प्रकरणात राज्य सरकारने हस्तक्षेप करून सचिन यांना या जाहिरातीतून माघार घेण्याची विनंती केली होती. पण राज्य सरकारनेही याकडे दुर्लक्ष केलं. राज्य सरकारच याकडे दुर्लक्ष करत असल्याचं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.