काय सांगता? ‘एक्स’ देणार व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर, जाणून घ्या नवीन फीचर्स

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

इलॉन मस्क (Elon Musk) त्याच्या युझर्ससाठी सद्य नवीन-नवीन फीचर्स आणत असतो. तसेच त्याने आज त्यासंदर्भात एक मोठी घोषणा केली आहे. एक्स (ट्विटर) या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंगचीही मिळणार असल्याचे सांगितले आहे. मस्कने आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून याबाबत माहिती दिली आहे. “एक्सवर आता व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्स करता येतील. लवकरच हे फीचर उपलब्ध होणार आहे. आयओएस, अँड्रॉईड, मॅक आणि पीसी या सर्व प्लॅटफॉर्मवर हे फीचर काम करेल.” असं मस्कने त्याच्या पोस्ट मधून सांगितले आहे.

फोन नंबरची गरज नाही
सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक्स अकाउंटच्या माध्यमातून हे ऑडिओ/व्हिडिओ कॉल झाल्यावर समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर तुमच्याकडे असण्याची गरज नाही. म्हंजे युसर्सला आपला नंबर शेअर न करता सुद्धा बोलता येणार आहे.

एक्स ठरणार ‘ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक’
एवढाच नाही तर, आयफोन, अँड्रॉईड, अ‍ॅपल मॅकबुक आणि विंडोज किंवा अन्य पीसी अशा सर्व डिव्हाईसेसना हे फीचर्स सपोर्ट करणार आहेत. त्यामुळे ‘एक्स’ हे एकप्रकारे ग्लोबल अ‍ॅड्रेस बुक ठरेल,

व्हॉट्सअ‍ॅपला देणार टक्कर
या फीचरमुळे आता एक्स हे थेट मेटाच्या व्हॉट्सअ‍ॅपला टक्कर देण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉल करण्यासाठी आपल्याकडे समोरच्या व्यक्तीचा फोन नंबर असणं आवश्यक आहे. एक्सवर कॉल करताना याची आवश्यकता नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे लोक याचा अधिक वापर करण्याची शक्यता आहे.

काही दिवसांपूर्वी मेटाने थ्रेड्स नावाचं अ‍ॅप लाँच करून ‘एक्स’ला मागे टाकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, थ्रेड्सची हवा काही दिवसांतच कमी झाली.

Leave A Reply

Your email address will not be published.