ब्रेकिंग.. इमारतीला भीषण आग, 63 लोकांचे मृत्यू (व्हिडीओ)

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. आज पहाटे जोहान्सबर्गमध्ये ५ मजली इमारतीला भीषण आग लागली. कमी वेळेतच मोठे   अग्नितांडवात झाले. यात  आतापर्यंत 63 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून ४३ जण जखमी आहे. दरम्यान अग्निशामक दलाने आगीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवले असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. अशी माहिती एएनआय वृत्तसंस्थेने दिली आहे.

यासंदर्भात जोहान्सबर्ग शहर आपत्कालीन व्यवस्थापन सेवांचे प्रवक्ते, रॉबर्ट मुलाउडझी यांनी, X वर पोस्ट केल्यानुसार, “नवीनतम अपडेट 58 मृतदेह बाहेर काढले आणि 43 जखमी आहेत. अजूनही शोध आणि बचावकार्य सुरू आहेत. घटनास्थळी उपचार घेतलेल्या अनेक रुग्णांना पुढील वैद्यकीय सेवेसाठी विविध आरोग्य सेवा सुविधांमध्ये नेण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, आपत्कालीन व्यवस्थापन सेवांनी सांगितले की, गुरुवारी पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत आणखी ४३ लोक जखमी झाले आहेत.  अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार आगीचे कारण आणि नुकसानीचा आकडा अद्याप समजू शकलेला नाही. मात्र, आग मोठ्या प्रमाणावर विझवण्यात आली असून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.