भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानीकावर हल्ला, वाचा काय आहे प्रकरण

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील वैज्ञानीकावर हल्ला झाल्याचे समोर आले आहे. कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वैज्ञानिकाचे नाव आशीष लांबा असून, या प्रकरणी पोलीसही अलर्ट मोडवर आले असून आरोपींचा शोध सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘X’ वरील प्रोफाइलनुसार, आशीष लांबा हे इस्रोमध्ये वैज्ञानिक असल्याचे दिसत आहे. त्याच्यासोबत ही घटना बेंगळुरू येथील ओल्ड एअरपोर्ट रोडवरील नव्या एचएएल अंडरपास जवळ घडली. घडलेल्या संपूर्ण प्रकारची माहिती त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरून दिली आहे. महत्वाचे म्हणजे, इस्रोचे कार्यालय घटनास्थळापासून काही अंतरावरच आहे.

काय म्हणाले आशिष लांबा?
ते म्हणाले की, “काल, इस्रो कार्यालयाजवळ नव्याने बांधलेल्या HAL अंडरपासजवळ, एक हेल्मेट न घातलेली व्यक्ती बे जबाबदारपणे स्कूटी चालवत आमच्या समोर आली आणि मी अचानक ब्रेक लावला,” त्यानंतर त्यांनी अजून एका पोस्टच्या माध्यमातून सांगितले की, ‘तो व्यक्ती आमच्या कार जवळ आला आणि भांडू लागला. त्याने दोन वेळा माझ्या कारला पाय मारला.’

घटनेची माहिती मिळताच बेंगळुरू पोलीसही लागलीच सतर्क झाले आहेत. यासंदर्भात बोलताना पोलिसांनी सांगितले आहे की, “घटनेची नोंद करण्यात आली असून, आम्ही संबंधित अधिकार्‍यांना याची माहिती देऊ.” तसेच, त्यांनी पुढील चौकशीसाठी लांबा यांचा संपर्क तपशील मागवला आहे. तसेच दुसरीकडे सोशल मीडिया युजर्सनीही हल्लेखोरावर कारवाईची मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.