मोठी बातमी.. रूपाली चाकणकर यांचा राजीनामा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

रुपाली चाकणकर यांनी महिला राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा पदाचा राजीनामा दिला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी घेतल्याने पक्षाच्या पदाची सूत्रे त्यांनी सोडली असल्याचे सांगण्यात आले. रुपाली चाकणकर यांच्या जागी आता राष्ट्रवादी काॅंग्रेस कोणाला संधी देणार, याची उत्सुकता आहे.

चाकणकर यांनी पुण्याच्या महिला राष्ट्रवादीच्या अध्यक्षा म्हणून काम पाहत होत्या. त्यानंतर त्यांना प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या उपाध्यक्षा म्हणून संधी मिळाली. राज्यात 2019 च्या विधासभा निवडणुकीच्या वेळी महिला राष्ट्रवादीच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी अचानक राजीनामा दिल्याने तेथे चाकणकर यांना संधी मिळाली.

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची संधी मिळाली. हे पद अर्धन्यायिक स्वरूपाचे असल्याने या पदावरील व्यक्तींनी पक्ष संघटनेत राहावे का, अशी नेहमीच चर्चा असते. त्यांनी आता संघटनेचे पद सोडले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.