खडसेंना निवासस्थानी जाऊन रूपालीताई चाकणकारांनी दिली भेट

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आज दिनांक ८ फेब्रुवारी २०२२ रोजी माजी महसूल मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते एकनाथराव खडसे यांचा जळगाव येथील ‘मुक्ताई’ निवास्थानी भेट दिली. यावेळी एकनाथराव खडसे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी रोहिणी खडसे, अशोक लाडवंजारी व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमाअंतर्गत जळगाव जिल्हयातील तक्रारींची जनसुनावणी निमित्त आज मंगळवार दि. 08 फेब्रुवारी रोजी आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्हा दौऱ्यावर आहेत.

महाराष्ट्र राज्य महिला आयोग महिलांच्या सक्षमीकरणासाठी अविरत प्रयत्न करत आहे.. महिलांना त्यांच्या जिल्हयाच्या ठिकाणी न्याय मिळावा यासाठी “महिला आयोग आपल्या दारी” हा उपक्रम राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या पुढाकाराने राबविण्यात येत आहे. यामध्ये विभाग स्तरावर महिलांच्या तक्रारींचे निवारण करण्याचा प्रयत्न आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.