मुख्यमंत्री पदाचे दावेदार असलेल्या नेत्यांना खड्यासारखे बाजुला केले- मेहबूब शेख

0

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क

भाजपा हा पक्ष ओबीसीविरोधी पक्ष असुन त्यांचे खाण्याचे दात व दाखविण्याचे दात वेगळे असल्याने त्यांनी राज्याला इम्पेरियल डाटा दिला नाही. ज्या बहुजन समाजातील नेत्यांनी २५ ते ३० वर्ष पक्ष वाढविण्याचे काम करुन ते मुख्यमंत्री पदाचे दावेदार होत असतांनाच त्यांना खड्यासारखे बाजुला करुन मुख्यमंत्री मंत्री पदावर नागपुरचे पार्सल आणले.

स्व. गोपीनाथ मुंडें, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांना तिकीट नाकारुन त्यांच्याच घरातील वारसांना तिकीट देवुन मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याच्या भितीने निवडणुकीत इतर पक्षांशी हातमिळवणी करुन पाडले. यात पंकजा मुंडे, रोहिणीताई खेवलकर यांची काय अवस्था केली ? हे सर्वांनाच ज्ञात असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितले. ते पाचोरा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष कार्यालया जवळील प्रांगणात शरद युवा संवाद यात्रे निमित्त बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. दिलीप वाघ होते.

यावेळी युवकांना मार्गदर्शन करताना मेहबुब शेख यांनी सांगितले की, केंद्रातील भाजपा हा पक्ष सर्वच स्तरावर अपयशी ठरला असुन गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडले असुन सर्व सामान्य नागरिकांना जीवन जगणे असाह्य झालेच आहे. परंतु निवडणुकी वेळी त्यांनी दिलेले २ कोटी नोकऱ्यांचे आश्वासनही फोल ठरले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा पिढीने देशाचे नेत शरदचंद्र पवार यांचे विचार घरोघरी पोहचविल्यास यापुढील सत्ताही राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांच्या हाती असेल.

या संवाद यात्रेत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र सोडत गिरिश महाजन यांना नाव न घेता पिस्तुल्याची उपमा दिली. भाजपा वाले हे संविधान विरोधी लोक असुन त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान कधीही मान्य नाही. यावेळी मेहबूब शेख यांनी भाजपाने राजकीय संस्कृती धुळीस मिळविल्याचे ही सांगितले. तर मा. आ. दिलीप वाघ यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना सांगितले की, राज्यातील आघाडी सरकार मध्ये असलो तरीही पक्ष वाढविण्याची जबाबदारी युवकांवर असल्याने भविष्यात होवु घातलेल्या नगरपरिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या स्वबळावर लढविणार असल्याने त्यात युवकांना मोठ्या प्रमाणात संधी दिली जाणार असल्याने युवकांनी घरा घरा पर्यंत पोहचुन पक्ष बळकट करण्याचे आवाहन केले.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक अध्यक्ष मेहबूब शेख, युवकांचे जिल्हाध्यक्ष रविंद्र नाना पाटील, आ. दिलीप वाघ, अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष मजहर पठाण, जिल्हा प्रवक्ते खलील देशमुख, पी. टी. सी. चे चेअरमन संजय वाघ, व्हाईस चेअरमन विलास जोशी, विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, शालिग्राम मालकर, तालुका अध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष अजहर खान, पिपल्स बँकेचे संचालक प्रकाश पाटील, विघ्नहर्ता मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ. सागर गरुड, नगरसेवक भुषण वाघ, अशोक मोरे, बशीर बागवान, पंचायत समितीचे गटनेते ललित वाघ, डॉ. पी. एन. पाटील, सुदाम वाघ, सिताराम पाटील, योगेश देसले व्यासपीठावर होते. यावेळी दत्ता बोरसे, ए. बी. अहिरे, प्रा. मनिष बाविस्कर, सतिष चौधरी, हारुन देशमुख, युवकांचे तालुका अध्यक्ष अभिजीत पवार, शहराध्यक्ष सुदर्शन सोनवणे, वैभव पाटील, किशोर डोंगरे, हेमंत पाटील, प्रविण वाघ, अॅड. अविनाश सुतार, बंटी पाटील, गौरव शिरसाठ, सचिन शिंदे, दर्शन शिरसाठ, रविंद्र राठोड उपस्थित होते. कार्यक्रमात मा. आ. दिलीप वाघ, मजहर पठाण, नितीन तावडे, रविंद्र पाटील, योगेश देसले, शेख रसुल शेख उस्मान, विकास पाटील, अभिजीत पवार यांनी मार्गदर्शन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.