रुग्णवाहिकेचा अपघात; आत होत्या तब्बल 11 गरोदर माता…

0

 

शहादा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहादा येथील लोणखेडा कॉलेजच्या गेटसमोर अचानक रुग्णवाहिका उलटली. तेलखेडी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्ण घेऊन हि रुग्णवाहिका निघाली होती. आणि या रुग्णवाहिकेत तब्बल 11 गरोदर माता होत्या.

शहादाजवळ रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाला आहे. रुग्णवाहिका गरोदर माता आणि रुग्णांना घेऊन जात होती. शहादा येथील लोणखेडा कॉलेज गेटसमोर रुग्णवाहिका उलटल्यामुळे हा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. चालकाचा वाहनाच्या वेगावर नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या अपघातामध्ये जखमी झालेल्या रुग्णांना शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं आहे. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.