बंद घर फोडून पाच लाखांचा मुद्देमाल चोरी

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

जळगाव शहरातील सिंधी कॉलनी येथे व्यापाऱ्याचे बंद घर फोडून अडीच लाखाची रोकड आणि सोन्याचे दागिने असा एकुण ५ लाखांचे मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सिंधी कॉलनीतील साधना आश्रम जवळील कंवर नगरातील रोहीत ईद्रकुमार मंधवानी (वय ३०) हे कुटुंबियांसह राहतात. त्यांचे बळीराम पेठमध्ये होम अप्लायन्स नावाने किचन वेअरचे दुकान आहे. रोहीत याच्या आत्याच्या मुलाचे लग्न असल्याने ते कुटुंबियांसह २२ रोजी रात्री १० वाजता अमरावतीला घर बंद करून गेले होते.

२५ एप्रिल सोमवार रोजी लग्नाचा कार्यक्रम आटोपून ते ८ वाजेच्या सुमारास घरी परतले तेव्हा त्यांना घराच्या मुख्य दरवाजाचा कडी कोयंडा तुटलेला दिसला. दरम्यान त्यांनी घरात जावून पाहणी केली असता हॉल, बेडरुम, किचन व स्टोर मधील सामान अस्ताव्यवस्त पडलेला दिसून आला. तर घरातील लोखंडी कपाटाचे लॉक तुटलेले दिसून आले. तसेच कपाटात ठेवलेले सात तोळे सोन्याची दागिने व अडीच लाख रुपयांची रोकड त्यांना दिसली नाही. तसेच सोने व चांदीचे दागिने, मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवलेल्या व्हीएचए कंपनीच्या ४० मिक्सरच्या मोटारी देखील चोरीस गेली.

याप्रकरणी रोहित मंधवानी यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस कर्मचारी करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.