बापरे.. 3 मैत्रिणींची धावत्या ट्रेनमधून उडी; काळजाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईत धावत्या लोकलमध्ये चढणे आणि उतरणे चांगलेच जीवावर बेतू शकतं. यामुळे अनेकांनी रेल्वे अपघात आपला जीव गमावला आहे. तरी देखील हे प्रकार थांबत नाहीय. असाच एक अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर आला आहे.

जोगेश्वरी रेल्वे स्टेशनमधील धक्कादायक घटना समोर आलीय. जोगेश्वरीला तिघी मैत्रिणी लोकलमध्ये चढल्या. पण स्टेशनवरुन लोकल सुटली आणि वेग पकडू लागली होती. तेवढ्यातच एका तरुणीने रेल्वेतून उडी टाकली होती. लोकलच्या विरुद्ध दिशेने लोकलमधून उडी टाकणे या तरुणीच्या अंगलट आले आहे.

अंगावर काटा आणणारा व्हिडिओ-

धक्कादायक प्रकार म्हणजे या तरुणीच्या मागोमाग इतर दोघा तरुणींनी देखील याच लोकलमधून एकामागोमाग एक उड्या टाकल्या आहेत. या घटनेने जोगेश्वरी रेल्वे स्थानकातील सगळ्यात प्रवाशांच्या काळजाचा थरकाप उडाला होता. ही संपूर्ण थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस अधिकारी कैसर खालिद यांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनीच या घटनेचा व्हिडीओहीट्वीटरवरुन शेअर केला. कैसर खालिद यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही संपूर्ण घटना 16 एप्रिल रोजी घटली. पश्चिम उपनगरीय मार्गावरच्या जोगेश्वरी रेल्वे स्थानकात अंगावर काटा येईल, अशी घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

या व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे जोगेश्वरी रेल्वे स्टेशनवर एक लोकल थांबली होती. ३ मैत्रिणी या लोकलममध्ये चढताना दिसत आहेत. इतर प्रवासी लोकलमध्ये चढतात. थोड्याच वेळात लोकल स्टेशनवरुन सुटली. गाडी वेग पकडण्यास सुरुवात करते. तेवढयात तिघा मैत्रिणींमधील एक मुलगी गाडीतून उडी टाकते. लोकलच्या ज्या दिशेने जात असते, त्याच्या बरोबर विरुद्ध दिशेने उडी टाकल्याने या तरुणीचा तोल पूर्णपणे गेला आहे. तरुणी स्टेशनवर कोसळते आणि लोकलच्या पायदान आणि प्लॅटफॉर्मच्या मध्यभागी फरफटत गेली आहे. तोल गेलेली तरुणी स्टेशनवर कोसळते आणि रेल्वे स्टेशन आणि लोकलच्या मधल्या जागेत ती चाकांखाली जाणार की काय, असे चित्र निर्माण झाले होते.

दरम्यान, एक होमगार्ड देखील मागच्या डब्यातून जीवाची बाजी लावत उडी टाकला आहे. मुलीला चाकाखाली जाण्यापासून रोखतो. तिला मागे ओढतो. मात्र, याच सगळ्यात या मुलीच्या इतर २ मैत्रिणी देखील लोकलमधून उड्या टाकल्या आहेत. स्टेशनवरुन उड्या टाकलेल्या या दोन्ही तरुणी सुदैवाने स्टेशनवर पडतात. मैत्रीन उतरल्याचे बघून या दोघीही तरुणींनी धावत्या लोकलमधून उडी टाकल्याचे दिसून येत आहे. जीआरपीचे होम गार्ड अल्ताफ शेख यांच्या प्रसंगावंधानामुळे या लोकलमधून उडी टाकणाऱ्या तरुणींचा जीव थोडक्यात वाचला आहे. या होमगार्डने बजावलेल्या कर्तव्याचे आणि त्याच्या धाडसाचे कौतुक सर्वत्र होत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.