प्यार मे कुछ भी ! महिला थेट विजेच्या खांबावर चढली (व्हिडीओ)

तीन मुलांची आई अन् विवाहबाह्य संबंध

0

गोरखपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

आजकाल प्रेमाच्या व्याख्या बदलल्या आहेत.. ‘प्यार मे कुछ भी करेगा’ अशी घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यात घडली आहे. महिलेचे अनैतिक संबंध उघड झाल्याने महिला थेट विजेच्या खांबावर चढली आहे. महिलेला तीन मुले असून तीचे गेल्या सात वर्षापासून प्रेमसंबंध होते. ही बाब पतीला समजताच त्याने विरोध केला. यानंतर महिला आत्महत्या करण्याची धमकी देऊ लागली.

सदर महिलेने विजेच्या खांबावरील ताराला फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न देखील केला आहे. यावेळी उपस्थित लोकांनी पोलिसांना संपर्क केला. तसेच वीजपुरवठा खंडित केला. ही घटना बुधवारी घडली. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. ज्यात ती महिला विजेच्या खांबावर आणि स्थानिक लोक तिला खाली उतरण्याची विनंती करताना दिसत आहेत.

https://x.com/NCMIndiaa/status/1775545497521885471

महिला तीन मुलांची आई असून तिचे एका तरुणासोबत संबंध होते. त्यांचे विवाहबाह्य संबंध पती राम गोविंद (३५) याला समजल्यानंतर तिने आपल्या प्रियकराला आपल्या पतीप्रमाणेच राहू द्या, अशी मागणी केली. पती गोविंदने याला स्पष्ट नकार दिला. त्यामुळे महिला घरातून निघून गेल्यावर विजेच्या खांबावर चढून ताराला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

“विद्युत खांबावर चढलेल्या महिलेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे एक पथक घटनास्थळी पोहोचले. प्रथमदर्शनी हे घरगुती वादाचे प्रकरण असल्याचे दिसते. आम्ही स्थानिक विद्युत विभागाच्या मदतीने महिलेला खाली उतरण्यास तयार केले. महिलेला वाचवण्यात आले आणि तिला तिच्या पतीसह घरी परत पाठवण्यात आले. आमच्याकडे अद्याप कोणतीही तक्रार आलेली नाही,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.