भयंकर दरोडा.. बाळाला तलवार‎ लावत दागिन्यांसह 6.5 लाख‎ ‎लुटले

0

कजगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भडगाव तालुक्यातील कजगाव येथे एक भयंकर घडली आहे. आठ ‎दराेडेखाेरांनी दाेन घरांमध्ये सशस्त्र दराेडा टाकून ‎दागिने व राेकड असा जवळपास साडे सहा ‎लाखांचा ऐवज लुटला. रविवारी ‎मध्यरात्रीनंतर एक ते दाेन वाजेच्या दरम्यान पारोळा ‎रोड व रेल्वे स्टेशन परिसरात ही घडली. ‎दराेडेखाेरांनी घरातील लाेकांना शस्त्रांचा धाक ‎दाखवत तसेच एका ठिकाणी सहा महिन्याच्या ‎बाळाच्या गळ्याला तलवार लावून लूट केली. हे ७ ते ‎८ दराेडेखाेर हे हिंदी भाषिक तसेच २५ ते ३०‎ वयाेगटातील असून ‎त्यांनी चेहऱ्यांना मास्क लावलेले हाेते.

लॉक‎तोडून घरात प्रवेश

पहिल्या घटनेत  कजगाव येथील रेल्वे स्टेशन परिसरात राजश्री‎ नितीन देशमुख (वय ४८) ह्या आपल्या ‎कुटुंबीयांसह राहतात. रविवारी रात्री त्या घरी‎ एकट्याच होत्या. त्यांची सासू व मुलगा हे ‎बाहेरगावी गेले होते. रात्री त्या झाेपलेल्या असताना ‎दरोडेखोरांनी त्यांच्या घराच्या दरवाजाचे लॉक‎तोडून घरात प्रवेश केला. व राजश्री देशमुख यांना ‎मारहाण करत पैशांची मागणी केली. तसेच‎ घरातील सामान अस्ताव्यस्त केले. राजश्री देखमुख यांच्या घरातून  ३ लाखांचे दागिने व १ लाख रुपयांची ‎राेकड लुटल्याचे सांगितले जात आहे.

बाळाला वेठीस धरले 

दुसऱ्या घटनेत दरोडेखोरांनी घरातील ६‎ महिन्याचे लहान बाळाला तलवार लावून जिवे मारण्याची ‎धमकी देत पैशांची मागणी केली.  दरोडेखोरांकडे ‎तलवार, लोखंडी सळई अशी शस्त्रे ‎हाेती. येथून ‎दागिने व राेकड अडीच लाखांचा ऐवज ‎लुटल्याची माहीती समोर आली आहे.‎

अंगावरचे दागिने ‎कटरने कापले 

दरोडेखोर पारोळा रोडवरील ओंकार ‎चव्हाण यांच्या घराचा ‎मागील दरवाजा तोडून घरात प्रवेश ‎केला. या वेळी चव्हाण कुटुंबीय‎ झोपलेले होते. दरोडेखोरांनी चव्हाण‎ कुटुंबीयांनाही मारहाण करत घरातील‎ स्त्रियांच्या अंगावरील दागिने हिसकवले. ‎तसेच त्यांच्या अंगांवरचे दागिने कटरने‎ कापल्याचे महिलांनी सांगितले.‎

 

Leave A Reply

Your email address will not be published.