खाद्यसंस्कृती : मोकळी डाळ/वाटली डाळ

0

लोकशाही विशेष 

मोकळी डाळ किंवा वाटली डाळ ही एक पारंपरिक महाराष्ट्रीयन पाककृती आहे. गणपती विसर्जन, अनंत चतुर्दशी दिवशी हमखास प्रसाद म्हणून वाटली डाळीचा प्रसाद वाटला जातो. चला तर मग वाटली डाळ झटपट कशी करावी ते पाहूया.

साहित्य: 

१/२ कप चणा डाळ, ३/४ हिरवी मिरची, चार पाकळ्या लसूण, १ चमचा तेल, १/२ चमचा मोहरी, १/२ चमचे जिरे, चिमूटभर हिंग, १० /११ पानं कढीपत्ता, १/२ चमचा हळद,१/२ चमचा लाल तिखट, १/२ वाटी किसलेले खोबरे (ओल्या नारळाचा किस) चवीनुसार मीठ, १/२लिंबाचा रस, बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती:

१. प्रथम डाळ स्वच्छ धुवून २ ग्लास पाणी घालून चार ते पाच तास भिजवुन घ्यावी.

२. भिजवलेली डाळ पाणी काढून त्यामध्ये मिरची व चार पाकळ्या लसूण घालून मिक्सरमधून रवाळ अशी वाटून घ्यावी.

३. आता कढईत तेल गरम करून तेलामध्ये फोडणीसाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, मिठ घालून परतून घ्या.

४. आता त्यामध्ये वाटली डाळ घालून मंद आचेवर ही डाळ आठ ते दहा मिनिट झाकण ठेवून वाफवून घ्यावी.

५. अधुन मधून डाळ परतवून घ्या. म्हणजे डाळ शीजेल.

६. आता वरुन लिंबाचा रस, किसलेले खोबरे, व कोथिंबीर  घालून वाटली डाळ प्रसादासाठी तयार करा.

 

अपर्णा स्वप्निल कांबळे – नांगरे.

पत्रकार/फुड ब्लॉगर

९८९२१३८१३२

Leave A Reply

Your email address will not be published.