ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली; तरुण जागीच ठार…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

जळगाव शहराच्या जवळच असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अपघात होऊन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली गेली त्यामुळे तरूण जागीच ठार झाला आहे. आज दि.19 रोजी सकाळी 7.30 वाजेच्या सुमारास घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे संदीप गोरख देसले हा तरुण पत्नी व दोन मुलांसह राहत होता. नेहमीप्रमाणे त्याने सुरत ते कासोदा येथून लक्झरीची ट्रिप आणून सकाळी 6 वाजता कासोदा येथे प्रवाशांना सोडले. त्यानंतर कासोदा येथून जळगावकडे येण्यासाठी संदीप दुचाकीने सोमवारी 19 जून रोजी सकाळी निघाला. दरम्यान सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास जळगाव शहराजवळील पाळधी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पोलिसांनी धरणगावकडून जळगावकडे येणाऱ्या ट्रकला थांबविले. चालकाने ब्रेक दाबताच महामार्गावर अचानक ट्रक थांबला आणि मागून येणारा संदीप हा ट्रकवर आदळल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.

अचानक थांबलेल्या ट्रकवर दुचाकीस्वार तरुण आदळल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना महामार्ग पोलिसांना कळताच, त्यांनी जखमी संदीपला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु त्यापुर्वी त्याची प्राणज्योत मालवली होती. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.