RBI ची ‘या’ बँकेवर मोठी कारवाई; ग्राहकांवर थेट परिणाम

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

 

नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अनेक बँकांवर कारवाई करत असते. गेल्या चार दिवसांपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून स्टेट ट्रान्सपोर्ट को ऑपरेटिव्ह बँकेचे ऑडिट सुरू होते. ज्यामध्ये आर्थिक व्यवहारासंदर्भात आणि प्रशासकीय कामकाजाबाबत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या असून यावर आरबीआयने आक्षेप नोंदवला आहे.

 

बँकेचे खेळते भांडवल अधिक वापरल्याने त्याचा रेशो 75 ऐवजी 94  वर गेला आहे. ठेवीदारांनी आतापर्यंत सुमारे 400 कोटी ठेवी काढून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे आरबीआयने एसटी बँकेचे कर्ज प्रकरण थांबवली असल्याचे पोस्ट समाज माध्यमांवर व्हायरल झाल्या आहे.

एसटी बँकेचे उपमहाव्यवस्थापक किशोर आहेर यांनी एसटी बँकेच्या सर्व शाखांना सूचना दिल्या असल्याचे अनेकांनी सांगितले आहे. ज्यामध्ये मुख्य कचेरी मार्फत संघनक यंत्रणेतून सर्व प्रकारचे कर्ज खाते तात्पुरत्या कालावधीसाठी डेबिट फ्रिज करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत कोणत्याही प्रकारच्या कर्ज व्यवहारासंबंधी कार्यवाही करू नये अशा सूचना दिल्या आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.