अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवले

0

जळगाव : तालुक्यातील एका गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला जळगाव शहरातील एका भागातून अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळविल्याची घटना ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजता समोर आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव तालुक्यातील एका गावात १६ वर्षीय मुलगी वास्तव्यास आहे. दि. ३० ऑक्टोंबर रोजी रात्री साडेअकरा ते दि. ३१ ऑक्टोबर रोजी पहाटे चार वाजेच्या दरम्यान घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीला काहीतरी आमिष दाखवत फूस लावून पळवून नेले. हा प्रकार पहाटे चार वाजेच्या सुमारास लक्षात आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यामुळे शुक्रवारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अज्ञात व्यक्तीविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक दयानंद सरवदे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.