आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेतून पाय घसरून पडल्याने मुलाचा मृत्यू

0

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

मावशीच्या घरून जळगावकडे मेमू रेल्वेने आईसोबत जाणाऱ्या मुलाचा धावत्या रेल्वेतून पाय घसरून तो आईच्या डोळ्यादेखत खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. प्रणव विजय बारी (वय २० वर्ष, रा. गांधी चौक, पिंप्राळा, जळगाव) असे मृत युवकाचे नाव आहे.

प्रणव बारी हा आई-वडिलांसह प्रिंप्राळा भागातील गांधी चौकात राहत असून सध्या तो पुण्यातील सिंहगड कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. नातेवाईकाच्या लग्नासाठी काही दिवसांपूर्वी प्रणव हा जळगावी घरी आलेला होता.

शुक्रवारी प्रणव व त्याची आई ज्योती बारी असे दोघेही भुसावळ येथे मावशीकडे भेटण्यासाठी गेलेले होते. मावशी व मावस भावाला भेटून रविवारी सकाळी ७ वाजता प्रणव हा आईसोबत जळगाव येथे जाण्यासाठी भुसावळ मेमू रेल्वेत बसला होता. आई ज्या सीटवर बसली होती, त्या सीटसमोरच असलेल्या दरवाजात प्रणव हा उभा होता. मेमूने भुसावळ स्टेशन सोडल्यानंतर काही अंतरावर प्रणवचा तोल गेल्याने तो धावत्या रेल्वेतून आईच्या डोळ्यादेखत खाली पडला.आणि आईने जागेवरच आक्रोश केल्याने उपस्थितांचेही मन हेलावून गेले.

हा प्रकार लक्षात आल्यानंतर ज्योती बारी यांनी आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने प्रवाशांनी रेल्वेची चैन ओढून रेल्वे थांबवली, त्यानंतर ज्योती बारी यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. माहिती मिळाल्यानंतर भुसावळ येथे राहणाऱ्या ज्योती यांच्या बहिणीचा मुलगा राकेश याने घटनास्थळी धाव घेतली. जखमी अवस्थेत प्रणव याला खासगी रूग्णालयात हलविले.असता डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. मुलाच्या मृत्यूमुळे आई ज्योती बारी यांना मोठा मानसिकआघात झाला असून कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.