मोठी बातमी.. कर्जावरील व्याजदर वाढणार; RBI कडून रेपो रेटमध्ये वाढ

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) रेपो रेटमध्ये (Repo rate) 50 बेस पॉइंट्सने वाढ केली आहे. यामुळे ग्राहकांच्या ईएमआयमध्ये वाढ होणार असल्याने सामान्यांचे आर्थिक गणित बिघणार आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) आज त्यांच्या चलनविषयक धोरण समितीचे (MPC Meeting) निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये रेपो दरात 0.50 टक्के बेसिस पॉइंट्स्ची वाढ करण्यात आली आहे, अशी माहिती RBI गव्हर्नर शक्तीकांत दास (RBI Governor Shaktikanta Das)  यांनी दिली आहे.

वाढीच्या निर्णयानंतर रेपो दर आता 5.90 टक्क्यांवर आला आहे. जो पूर्वी 5.40 टक्क्यांवर होता. रेपो दरातील वाढ तत्काळ प्रभावाने लागू करण्यात येणार असल्याचेही दास यांनी म्हटले आहे. याआधी ऑगस्टमध्ये आरबीआयने रेपो दरात 50 बेसिस पॉईंटची वाढ केली होती.

यावेळी दास म्हणाले की, महागाई वाढण्याचा धोका अजूनही कायम असून आव्हानात्मक काळात देशाची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचे ते म्हणाले. सणासुदीच्या काळात मागणी वाढल्याने महागाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.

रेपो दरात वाढ केल्याने सर्व प्रकारचे कर्जे महाग होणार आहे. वास्तविक रेपो दराच्या माध्यमातून आरबीआय बँकांना कर्ज देते. तर, याउलट रिव्हर्स रेपो रेट हा व्याज दर आहे जो मध्यवर्ती बँक आरबीआयकडे पैसे ठेवण्यासाठी बँकांना देते. त्यामुळे सामान्यतः असे मानले जाते की, जर आरबीआयने रेपो दर कमी केला तर बँका व्याजदर कमी करतात. तर, आरबीआयने जर रेपो दर वाढवला तर, बँका व्याजदर वाढवू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांनी घेतलेल्या कर्जेचे हप्ते महाग होऊ शकतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.