तब्बल 14 लाखाचा गांजा जप्त; एका आरोपीला अटक…

0

 

शिरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शिरपूर (Shirpur) तालुक्यातील सांज्यापाडा फत्तेपूर (Fattehpur) येथे छापा टाकत पोलिसांची (Police) गांजा शेती उध्दवस्त केली आहे. ही कारवाई काल 29 सप्टेंबर रोजी दुपारी करण्यात आली. यात तब्बल 14 लाखांची पाच ते सहा फुटांची गांजाची (Marijuana) झाडे जप्त करण्यात आली असून, एका आरोपीला ताब्यात घेतले आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, फत्तेपूर शिवारातील सांज्यापाडा येथे राहणारा जामसिंग जसमल पावरा याने विक्रीच्या उद्देशाने, वन जमिनीत प्रतिबंधीत गांजा सदृश अंमली पदार्थ वनस्पतीची लागवड केली असल्याची गोपनिय माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे स.पो.नि सुरेश शिरसाठ यांना मिळाली होती. याबाबत शिरसाठ यांनी पोलीस अधिक्षकांना माहिती दिली असता, त्यांच्या आदेशाने प्रादेशीक परिवहन अधिकारी सुनिल पाटील यांना सोबत घेत सांगवी पोलीस स्थानकाच्या टीमने काल दुपारी त्या संबंधित शेतात छापा टाकला. शेतात काही पिकांच्या आड गांजाची 5 ते 6 फुटांची झाडे दिसून आली. एकुण 14 लाख 46 हजार 600 रुपये किंमतीचे एकूण 482 किलो गांजा सदृश्य अंमली पदार्थाची झाडे जप्त करण्यात आली. तसेच जामसिंग पावरा यालाही ताब्यात घेतले. त्याच्याविरोधात शिरपूर तालूका पोलिसात एनडीपीएस (NDPS) कायद्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोसई संदीप पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

ही कारवाई (Action) पोलीस अधिक्षक प्रविणकुमार पाटील(Praveen kumar Patil), अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत बच्छाव (Prashant Bacchav) व उपविभागिय पोलीस अधिकारी दिनेश आहेर (Dinesh Aher) यांच्या मार्गर्शनाखाली स.पो.नि सुरेश शिरसाठ, पोसई. संदीप पाटील, भिकाजी पाटील, असई के.एस.जाधव, पो.हे.कॉ संजय सुर्यवंशी, चतरसिंग खसावद, पवन गवळी, जगदीश मोरे, पो.ना प्रविण धनगर, संदीप ठाकरे, अरिफ पठाण, संदीप शिंदे, भुषण चौधरी, अनिल शिरसाठ, मोहन पाटील, पो.कॉ जयेश मोरे, योगेश मोरे, प्रकाश भिल, रोहिदास पावरा, कृष्णा पावरा, संतोष पाटील, इसरार फारुकी व आरसीपी पथकाने (Team) केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.